मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

---Advertisement---

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क
मुंबई / अमरावती – राज्यात सन २०२६ च्या खरीप हंगामातील पर्जन्याच्या तुटीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शासन निर्णय क्रमांक समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२, दिनांक २५ सप्टेंबर २०२६ नुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये Trigger-1 अर्थात प्रथम कळ लागू झाल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयावर सह सचिव संजय इंगळे यांनी दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी डिजिटल स्वाक्षरी केली असून हा शासन निर्णय http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतांक २०२६०९२६१११७४९४९४१ सह उपलब्ध आहे.

प्रस्तावनेनुसार दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबतच्या कार्यपद्धतीनुसार कृषी आयुक्त यांच्या दिनांक २४ सप्टेंबर २०२६ च्या अहवालानुसार जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पंचनामे करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी तात्काळ सुरू करावी, तसेच सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र व जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिक परिस्थितीचा अहवाल आयुक्त कृषी यांच्या मार्फत शासनास सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

दुष्काळग्रस्त भागासाठी लागू करण्यात आलेल्या १२ सवलती आणि उपाययोजना खालील प्रमाणे –

१) जमीन महसुलात सूट
२) पीक कर्जाचे पुनर्गठन
३) शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
४) कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट, ७.५ हॉर्सपॉवर पर्यंत क्षमतेच्या वीजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले असून त्यावरील वीज पंपांना सदर सूट लागू असेल
५) शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
६) रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर
८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे
९) शेतीवर आश्रित शेतकरी आणि मजूर इत्यादी यांना अन्न धान्याची टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे
१०) जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे
११) जलसंधारणाची कामे सुरू करणे
१२) अगोदरच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्देशाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे

याशिवाय सदर २६५ तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून स्वतंत्र शासन निर्णयान्वये जाहीर केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

अमरावती विभागासाठी महत्त्वाचे – परिशिष्ट-१ नुसार अमरावती विभागात एकूण ३४ तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू झाला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ तालुके आहेत, त्यात धारणी, चिखलदरा, अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, दर्यापूर यांचा समावेश आहे. यामुळे मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांना या सवलतींचा थेट लाभ मिळणार आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment