मेळघाट वनरक्षक पदभरतीच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मागणीला अखेर दखल
युवा मेलघाट न्यूज
अमरावती, दि. १६ सप्टेंबर २०२६ – मेळघाट वनरक्षक पदभरतीच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे गेल्या ३१ दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे.
बच्चूभाऊ कडू यांच्या दालनात महत्त्वाची बैठक
माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज उपवनसंरक्षक अधिकारी यांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त जागांवर नियुक्ती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत उमेदवारांच्या मागणीवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तातडीने आवश्यक निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.



मन्ना दारसिंबे यांची प्रमुख उपस्थिती
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मन्ना दारसिंबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी वनरक्षक पदभरतीच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्याची भूमिका सातत्याने घेतली आहे.
३१ दिवसांच्या संघर्षाला यश
३१ दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची दखल घेण्यात आल्याने न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मेळघाट वनरक्षक उमेदवारांच्या न्याय्य मागणीसाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
मेळघाटातील युवकांना न्याय मिळण्याची आशा
या निर्णयामुळे मेळघाटातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.









