मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मेळघाटातील विविध प्रश्नांवर शिवसेनेची विशेष बैठक संपन्न: लवकरच मेळघाटात मा. ना. बच्चू भाऊ कडू आमदार यांचा जनता दरबार

---Advertisement---

मेळघाटातील विविध प्रश्नांवर शिवसेनेची विशेष बैठक संपन्न: लवकरच मेळघाटात मा. ना. बच्चू भाऊ कडू आमदार यांचा जनता दरबार

युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क
धारणी, दि. १९ सप्टेंबर २०२६ – मा. ना. श्री. बच्चूभाऊ कडू आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. मन्ना दारसिंबे, जिल्हा संघटक, शिवसेना यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी मेळघाटातील विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर विशेष बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत मेळघाटातील ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात आली. लवकरच मेळघाटात मा. ना. बच्चू भाऊ कडू आमदार यांचा जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे.

बैठकीतील प्रमुख विषय खालीलप्रमाणे –
१) जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वन विभागाच्या विरोधात आंदोलन उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.
२) मेळघाटातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबाबत नियोजन करण्यात आले.
३) प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये कार्यकर्ता मेळावे आयोजित करून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
४) दि. २८/०९/२०२६ रोजी मा. ना. श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब, खासदार यांच्या सभेसाठी मेळघाटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
५) वनपट्ट्याबाबत आजही ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गावागावात जाऊन वनपट्टा, त्यासंबंधीचे अधिकार व उपलब्ध प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मेळघाटातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या समस्या शासनस्तरावर मांडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या बैठकीत श्री गोपाल धुर्वे सरपंच, श्री. अनिल गायकवाड शहर प्रमुख, श्री. इजि जयदीप तांडिल, अँड गोविंद सावलकर, श्री. सुरज मालवीय सभापती धारणी नगरपंचायत, श्री. सुरज मावस्कर माजी सरपंच, श्री. सोहनलाल माजी सरपंच, सुरेश जावरकर, श्री किशोर भिलावेकर सरपंच, श्री. सुग्रीव धुर्वे सरपंच, श्री. भारत सोनोने, श्री. राजु परिहार, श्री. संजू बेठेकर, श्री. श्रीकांत पाण्डेय, डॉ. शैलेश जिरापे, श्री. दिनेश मावस्कर सरपंच, श्री. रामू जावरकर उपसरपंच, श्री. शालीकराम बेठेकर सरपंच, श्री. किरणा कुमार भिलावेकर माजी सरपंच, सौ. प्रेमलता मावस्कर, राकेश मावस्कर, श्री. शरद पाटिल, श्री. मुन्ना दहिकर उपसरपंच, श्री सुजलाल जावरकर, श्री. बाबू मावस्कर, श्री. रामकिशासन कास्देकर, हारी सावलकर, श्री. भागतराम पटोरकर, श्री. नितिन राठोड, श्री. संतोष चव्हाण, श्री. सुखदेव बेठेकर व इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या निवासस्थानी श्री गणपति बाप्पा चे दर्शन: पहा विडियो

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment