मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मेळघाटच्या १४,४९१ मतदारांचे फॉर्म अद्याप प्रलंबित: ८ ऑगस्ट शेवटची तारीख; उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांचे आवाहन, वेळेत न भरल्यास नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता

---Advertisement---

मेळघाटच्या १४,४९१ मतदारांचे फॉर्म अद्याप प्रलंबित; ८ ऑगस्ट शेवटची तारीख
उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांचे आवाहन, वेळेत न भरल्यास नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता

धारणी प्रतिनिधी, युवा मेलघाट न्यूज
०४ ऑगस्ट २०२६
मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण प्रक्रियेत ४१-मेळघाट विधानसभा मतदारसंघात अजूनही १४ हजार ४९१ मतदारांनी Enumeration Form भरले नसल्याचे समोर आले आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ८ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत आहे. मुदतीत फॉर्म न भरल्यास पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते, असा इशारा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी दिला आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालय, धारणी यांच्याकडून सोमवारी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली. पत्रकानुसार, मेळघाट मतदारसंघात धारणी शहरातील १२६५ आणि चिखलदरा शहरातील २६३ मतदारांसह एकूण १४,४९१ मतदारांचे फॉर्म प्रलंबित आहेत.

निवडणूक आयोगामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात SIR म्हणजेच Special Intensive Revision राबविले जात आहे. या अंतर्गत मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराला Enumeration Form भरून आपल्या क्षेत्रातील BLO यांच्याकडे जमा करणे बंधनकारक आहे. ज्या मतदारांनी अद्याप फॉर्म भरलेला नाही, त्यांनी तात्काळ तो भरून द्यावा, असे आवाहन शुक्ला यांनी केले आहे.

“मतदार यादी अद्ययावत करणे ही लोकशाही बळकट करण्याची पहिली पायरी आहे. कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी ०८/०८/२०२६ पूर्वी आपला फॉर्म BLO यांच्याकडे किंवा प्रशासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर जमा करावा,” असे शुक्ला यांनी पत्रात म्हटले आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, Enumeration Form न भरल्यास विशेष पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मतदारांनी याकडे गांभीर्याने पाहून वेळेत सहकार्य करावे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment