मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

टिटंबा विषबाधे नंतर आमदार केवलराम काळे यांची मागणी: सेंट्रल किचन तात्काळ बंद करा, स्वतंत्र स्वयंपाकगृह सुरू करा

---Advertisement---

टिटंबा विषबाधे नंतर आमदार केवलराम काळे यांची मागणी: सेंट्रल किचन तात्काळ बंद करा, स्वतंत्र स्वयंपाकगृह सुरू करा

युवा मेलघाट न्यूज
धारणी, २७ जुलै २०२६: धारणी तालुक्यातील टिटंबा आणि परिसरातील आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचनमधून पुरविल्या जाणाऱ्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना वारंवार विषबाधा होत असल्याचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर मेळघाटचे आमदार केवलराम तुळशीराम काळे यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी यांना लेखी पत्र देऊन सेंट्रल किचन तात्काळ बंद करण्याची आणि सर्व आश्रमशाळांना पूर्वीप्रमाणे स्वतंत्र भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

दिनांक २७ जुलै २०२६ रोजी दिलेल्या पत्रात आमदार काळे यांनी म्हटले आहे की, प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत कार्यरत शासकीय आदिवासी आश्रम शाळांमध्ये सेंट्रल किचन, डेव्हली येथून विद्यार्थ्यांना भोजन पुरविले जात आहे. मात्र सदर भोजनाच्या गुणवत्तेबाबत अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना घडली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी मोठा खेळ झाल्याचे समोर आले आहे.

पत्रात दिलेल्या माहितीनुसार दि. २५ जुलै २०२६ रोजी टिटंबा शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ व इतर त्रास सुरू झाला. या घटनेत सुमारे ७० विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर दि. २६ जुलै २०२६ रोजी पुन्हा सेंट्रल किचनमधून पुरविल्या गेलेल्या जेवणानंतर बिछुआबाडी शाळेतील सुमारे ५० विद्यार्थी, सावळीढोड शाळेतील सुमारे ३० विद्यार्थी तसेच सुमसरा शाळेतील अनेक विद्यार्थी आजारी पडल्याची गंभीर घटना घडली.

आमदार काळे यांनी सेंट्रल किचन हा शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असला तरी वारंवार विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याने हा प्रकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीव व आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ स्वरूपात ६ मागण्या केल्या आहेत:
१) संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात यावी.
२) दोषी अधिकारी, कर्मचारी, संबंधित संस्था अथवा कंत्राटदार यांच्याविरुद्ध तात्काळ फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
३) अन्नाचे नमुने तपासणीसाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पाठवून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.
४) चौकशी पूर्ण होईपर्यंत सेंट्रल किचन, डेव्हली येथून भोजन पुरवठा तात्काळ बंद करण्यात यावा.
५) प्रकल्प कार्यालयामार्फत सर्व शासकीय आदिवासी आश्रम शाळांना पूर्वीप्रमाणे स्वतंत्र स्वयंपाकगृह व स्वतंत्र भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी.
६) सदर प्रकरणातील चौकशी अहवालाची प्रत आपल्याला उपलब्ध करून द्यावी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे आवाहन आमदार केवलराम काळे यांनी पत्रातून केले आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

Leave a Comment