मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

ठिबक, तुषार संच खरेदीसाठी आता आधीच मिळणार अनुदान, शेतकऱ्यांना दिलासा

---Advertisement---

ठिबक, तुषार संच खरेदीसाठी आता आधीच मिळणार अनुदान, शेतकऱ्यांना दिलासा

युवा मेलघाट न्यूज़ नेटवर्क
मुंबई, – ठिबक आणि तुषार सिंचन संच खरेदीसाठी आधी लाखो रुपये उभे करावे लागण्याची शेतकऱ्यांची मोठी अडचण आता दूर होणार आहे. शासनाने अनुदानाची पद्धत बदलली असून आता खरेदीनंतर नव्हे तर खरेदीपूर्वीच अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा टप्पा दोन अंतर्गत हा नवा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत निवडक गावांतील पात्र शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल रुपी म्हणजेच सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या माध्यमातून हे अनुदान दिले जाणार आहे.

या नव्या पद्धतीत अनुदानाची रक्कम रोख स्वरूपात नाही तर डिजिटल टोकन किंवा क्यूआर कोडच्या स्वरूपात शेतकऱ्याच्या मोबाईलमधील वॉलेटमध्ये जमा होईल. त्यामुळे अनुदान येईपर्यंत वाट पाहण्याची गरज राहणार नाही.

यापूर्वी शेतकऱ्याला आधी संपूर्ण रक्कम भरून संच खरेदी करावा लागत असे आणि नंतर अनुदान खात्यात येत असे. त्यामुळे अनेक छोट्या शेतकऱ्यांना सुरुवातीचे भांडवल उभे करणे शक्य होत नव्हते. आता केवळ स्वतःचा हिस्सा भरून संच घेता येणार आहे.

यासाठी कृषी विभागाची पूर्वसंमती मिळाल्यानंतर मोबाईलवर टोकन येईल. विक्रेत्याकडे गेल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यावर अनुदानाचा हिस्सा थेट व्यवहारात जमा होईल आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्याने भरायची आहे.

या सुविधेचा लाभ पोकरा प्रकल्पातील २१ जिल्ह्यांतील निवडक गावांमधील शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमातीतील सर्व पात्र शेतकरी आणि सर्व प्रवर्गातील महिला शेतकरी पात्र असणार आहेत.

अर्ज करण्यासाठी महापोकरा संकेतस्थळावरील डीबीटी प्रणालीवर जाऊन ठिबक किंवा तुषार सिंचन घटक निवडावा लागेल. त्यामध्ये सीबीडीसीद्वारे अनुदान वितरण हा पर्याय निवडावा. अर्ज करताना मोबाईल क्रमांक प्रोफाइलला जोडलेला असणे आवश्यक आहे. तसेच गुगल प्ले स्टोअरवरून पीएनबी डिजिटल रुपी ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी लागणार आहे.

युवा मेलघाट न्यूज़ चैनल ला follow करा…
https://whatsapp.com/channel/0029Vb7sAujK0IBi6xYEtI3C

—Advertisement—
मालविया मूर्ति भंडार, रंगभवन मैदान, जयस्तंभ चौक धारणी. संजय मालवीय मो. 9420190084

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

Leave a Comment