मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर: ‘रक्तदान करा, हेल्मेट मिळवा’ उपक्रम

---Advertisement---

खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर: ‘रक्तदान करा, हेल्मेट मिळवा’ उपक्रम

युवा मेलघाट न्यूज़ | प्रतिनिधि दर्यापूर
दर्यापूर, दि. 26 जून 2026 : अमरावती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. बळवंत भाऊ वानखडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘खासदार बळवंत भाऊ वानखडे मित्र परिवार’ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक पाऊल समाजसेवेचे, एक पाऊल सुरक्षेचे’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित हे शिबीर येत्या दि. 2 जुलै 2026, गुरुवार रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत दर्यापूर येथील कृषी भवन येथे संपन्न होणार आहे.

खासदार महोदयांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविला जात आहे. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास प्रोत्साहन म्हणून आयोजकांतर्फे उत्कृष्ट दर्जाचे हेल्मेट भेट म्हणून देण्यात येणार आहे. “रक्तदानाने वाचेल रुग्णाचा जीव, हेल्मेटने वाचेल स्वतःचा जीव!” हा संदेश देत समाजसेवेसोबतच रस्ते सुरक्षेची जनजागृती करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. सध्या उन्हाळ्यामुळे अमरावती जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या शिबिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे. शिबिरात जमा होणारे रक्त गरजू रुग्ण, थॅलेसेमिया ग्रस्त बालके आणि आपत्कालीन शस्त्रक्रियांसाठी उपयोगी पडणार आहे.

शिबिर यशस्वी करण्यासाठी खासदार बळवंत भाऊ वानखडे मित्र परिवारातील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. यामध्ये इंजि. नितेश वानखडे, सागर देशमुख, चेतन गिते, संदीप पांडेकर, पोलेंद्र ढोके, तेजस नितनवरे, ऋग्वेद सरोदे, निखील कोकाटे, गौरव आठवले, जगदीश कांबे, सचिन धुर्वे, प्रज्ञावंत उमक, गौरव इंगळे, ऋषी शिंगाडे, संतोष आठवले, कैलास शिरसाट, रमेशभाऊ सावळे व मनोज लहुपचांग आदींचा समावेश आहे. आयोजकांनी दर्यापूर शहर व तालुक्यातील नागरिक, युवक-युवती व सर्व सामाजिक-राजकीय संघटनांना या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क साधा: इंजि. नितेश वानखडे – 96900 93682, सागर देशमुख – 96040 68301, संदीप पांडेकर – 96237 17681, निखील कोकाटे – 90969 49285` जगदीश कांबे- 9325489369

---Advertisement---
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

दर्यापूर तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – सर्वपक्षीय मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

दर्यापूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी

महाराष्ट्रातील लाखो महिलांना ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर मान्यता!महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ विधानसभेत एकमताने मंजूर – सातबारा नसतानाही मिळणार महिला शेतकरी प्रमाणपत्र

Leave a Comment