मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

टिटंबा, बिजूधावडी, सुसर्दा, सावलीखेडा विषबाधा प्रकरण शिवसेना ( उबाठा) ची मागणी: केंद्रीय जेवण व्यवस्था बंद करा, दोषींवर कठोर कारवाई करा

---Advertisement---

टिटंबा, बिजूधावडी, सुसर्दा, सावलीखेडा विषबाधा प्रकरण
शिवसेना (उबाठा) ची मागणी:
केंद्रीय जेवण व्यवस्था बंद करा, दोषींवर कठोर कारवाई करा

युवा मेलघाट न्यूज
धारणी, २७ जुलै २०२६
धारणी तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचनच्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या विषबाधेच्या घटनांनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. जिल्हा प्रमुख प्रा. प्रफुल भोजने यांनी उपविभागीय अधिकारी महसूल विभाग धारणी यांना २९ जुलै २०२६ रोजी निवेदन देऊन चौकशी करून जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धारणी तालुक्यातील आश्रम शाळा टिटंबा, बिजूधावडी ,सावलीखेडा येथे जेवणामुळे विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जेवण पुरवण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे केंद्रीय जेवण व्यवस्था तात्काळ बंद करून प्रत्येक शाळेला स्वतंत्र जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

शिवसेनेने आरोप केला आहे की ठरलेल्या शासकीय दर्जानुसार जेवणाचा दर्जा टिकवण्यात आलेला नाही. त्यामुळे योग्य दर्जा तपासणी व त्या जेवणाची तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय धारणी येथील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत.

मेळघाटातील सर्व आश्रम शाळांमध्ये प्रामुख्याने मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी असल्याने प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. प्रत्येक शाळेवर नेमणूक करण्यात यावी जेणेकरून शाळेच्या सर्व बाबींचा दर्जा कायम राखला जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. शिवसेने इशारा दिला आहे की या विषयाची दखल न घेतल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

निवेदन देताना जिल्हाप्रमुख प्रा. प्रफुल भोजने यांच्यासह उपजिल्हा प्रमुख शैलेंद्र मालवीय, तालुका प्रमुख राजू राठोड, शहर प्रमुख दिनेश धनेवार, मा.युवा सेना ता.प्रमुख धारणी पंकज मावस्कर, मा.तालुका संघटक चिखलदरा शिवराज मोर्ले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment