मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

---Advertisement---

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

युवा मेलघाट न्यूज़ ___________________________ मेळघाटातील जनतेसाठी मोठी दिलासादायक बातमी असून सेमाडोह येथे भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मा.आ.रविभाऊ राणा व उपेन बछले जिल्हा कार्याध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी व दत्ता मेघे उच्च शिक्षण संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

या शिबिरात पुढील आजारांची तपासणी व उपचार केल्या जाईल. मेडिकल तज्ञांकडून रक्तदाब, ब्लड शुगर, बरे दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, नेत्ररोग तज्ञांकडून डोळ्याचे आजार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सर्जरी तज्ञांकडून हायड्रोसिल हर्निया अंगावरील गाठी आतड्याचे आजार मुतखड्याचे व पोटाचे आजार, स्त्रीरोग तज्ञांकडून मासिक पाळीचे आजार व महिलांचे आजार, बालरोग तज्ञांकडून हृदयाला छिद्र असणे व कुपोषण सह लहान मुलांचे सर्व आजार, अस्थिरोग तज्ञांकडून संधिवात मणक्यात असणारी गाठ व फ्रॅक्चर, कान नाक घसा तज्ञ व त्वचा रोग तज्ञांकडून खाज गजकरण व पांढरे डाग यावर तपासणी होईल.

शिबिराची वैशिष्ट्ये म्हणजे शिबिर स्थळावर नोंदणी मोफत, तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी मोफत, भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या म्हणजे एक्स रे लघवी चाचणी सोनोग्राफी मोफत, भरती रुग्णांना खाट शुक्ल जेवण मोफत, तर सिटी स्कॅन एमआरआय सारख्या अतिविशिष्ट चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सवलतीच्या दरात केल्या जातील.

पात्र रुग्णांना आवश्यकतेनुसार पुढील उपचार व विविध शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील. यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन, अंगावरील गाठींच्या शस्त्रक्रिया, गलगंड थायरॉईड शस्त्रक्रिया, हर्निया हायड्रोसिल, कान नाक घसा संबंधित शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या हृदयातील छिद्राची शस्त्रक्रिया, हाडांचे फ्रॅक्चर उपचार, मेंदूच्या व हृदयातील शस्त्रक्रिया, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी उपचार, कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा, फाटलेले ओठ दुंभगलेला टाळू तसेच जन्मत असलेल्या मुखविकृतीवर शस्त्रक्रिया मोफत, तसेच आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत येणाऱ्या इतर पात्र शस्त्रक्रिया व उपचार यांचा समावेश आहे.

सूचना अशी आहे की भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था मोफत राहील. शिबिरातून भरती सांगितलेल्या रुग्णांनी आधार कार्ड सत्यप्रत, रेशन कार्ड सत्यप्रत, आयुष्यमान कार्ड सत्यप्रत सोबत आणावे. ज्या आरोग्य सेवा व औषधे रुग्णालयात उपलब्ध नाहीत त्याचा खर्च रुग्णांस स्वत करावा लागेल. या शिबिराची सवलत 1 महिन्याकरिता राहील.

शिबिराची तारीख रविवार 27 सप्टेंबर 2026 असून रुग्ण नोंदणी वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. शिबिराचे स्थळ जि.प. प्राथमिक शाळा सेमाडोह ता. चिखलदरा जि. अमरावती येथे आहे. अधिक माहिती करिता उपेन बछले जिल्हा कार्याध्यक्ष मो. 9579423704 / 9405320792 यांच्याशी संपर्क साधावा.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

मेळघाटातील विविध प्रश्नांवर शिवसेनेची विशेष बैठक संपन्न: लवकरच मेळघाटात मा. ना. बच्चू भाऊ कडू आमदार यांचा जनता दरबार

Leave a Comment