मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

---Advertisement---

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

युवा मेलघाट न्यूज| टिम ब्युरो ______________________ धारणी – तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना तसेच आवश्यक प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

तहसील कार्यालय धारणी यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय धारणी येथे या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांनी शासनाच्या विविध योजना व प्रमाणपत्रांचा लाभ मिळविण्यासाठी या अभियानात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांच्या प्रमाणपत्रासंबंधीच्या अडचणी दूर करून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांनी २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालय धारणी येथील नवीन प्रशासकीय इमारतीत उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार धारणी मा. प्रदीप शेवाळे यांनी केले आहे.

✨✨✨✨✨
श्रीराम ज्वेलर्सचे संचालक दिनेश राऊत यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची स्थापना; महाप्रसादाचे आयोजन

युवा मेलघाट न्यूज –
धारणी 24 सप्टेंबर 2026 – शहराचे प्रतिष्ठित नागरिक धारणी येथील श्रीराम ज्वेलर्सचे संचालक श्री दिनेश राऊत सर यांच्या निवासस्थानी बसविण्यात आलेल्या बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीभावात बाप्पाचे आगमन झाले असून गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गणपती बाप्पाच्या निमित्ताने आयोजित महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तीभावात संपन्न झाला.

यावेळी राऊत परिवारासह नातेवाईक, मित्रपरिवार, व्यापारी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाप्पाच्या दर्शनासह महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

मेळघाटातील विविध प्रश्नांवर शिवसेनेची विशेष बैठक संपन्न: लवकरच मेळघाटात मा. ना. बच्चू भाऊ कडू आमदार यांचा जनता दरबार

Leave a Comment