मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

खरीपासाठी बियाणे घेताय? ‘बिल-टॅग’ शिवाय खरेदी नकोच; धारणी कृषी विभागाचा इशारा

---Advertisement---

बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कृषी विभागाची करडी नजर, शेतकऱ्यांनो फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत दुकानातूनच खरेदी करा

युवा मेलघाट |
धारणी: खरीपाची पेरणी तोंडावर आली असताना धारणी तालुक्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहून फक्त परवानाधारक दुकानातूनच बियाणे घ्यावे, असा थेट इशारा तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव यांनी दिला आहे.

काय म्हणाले कृषी अधिकारी?
उमेश जाधव यांनी शेतकऱ्यांना 3 गोष्टी कटाक्षाने पाळायला सांगितल्या:

  1. बिल घ्या: बियाणे घेतल्यानंतर दुकानदाराकडून पक्के बिल घ्या आणि ते पेरणी होईपर्यंत जपून ठेवा.
  2. टॅग तपासा: पाकिटावरील टॅगवर वाणाचे नाव, कंपनी, उत्पादन तारीख, उगवणक्षमता आणि मुदत संपण्याची तारीख नक्की वाचा.
  3. उगवण चाचणी करा: घरीच थोडी बियाणे ओल्या कापडात गुंडाळून 3-4 दिवस ठेवा. 80% पेक्षा जास्त उगवले तरच पेरणी करा.

“बोगस किंवा निकृष्ट बियाण्यांमुळे उगवण होत नाही आणि शेतकऱ्याचे पूर्ण हंगाम वाया जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आकर्षक जाहिराती किंवा स्वस्त दराच्या आमिषाला बळी पडू नये. फसवणूक झाल्यास किंवा बोगस बियाणे विकताना कोणी आढळल्यास ताबडतोब आमच्या विभागाला कळवा. अशा माफियांवर आम्ही कठोर कारवाई करू,” असे जाधव यांनी सांगितले.

कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर
सध्या धारणी तालुक्यात कृषी विभागाचे पथक गावोगावी फिरून बियाणे, खते व औषध दुकानांची तपासणी करत आहे. शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन जनजागृतीही केली जात आहे. अनधिकृत विक्रेत्यांवर लक्ष ठेवले जात असून तक्रार आल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन:
बियाण्याबाबत काहीही शंका असल्यास किंवा फसवणूक झाल्यास धारणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment