मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मुंडे पॅटर्न सुरू: अन्न-औषध विभागात धडक मोहिमे मुळे भेसळ माफियांना घाम

---Advertisement---

7 दिवस, सलग छापे, सील कारवाई; नागरिक विचारतायत – ‘आतापर्यंत कुठे होता FDA?‘ आदिवासी बहूल मेळघाटात कारवाई कधी ?

युवा मेलघाट / न्युज नेटवर्क

मुंबई/अमरावती: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात सध्या ‘मुंडे इफेक्ट’ दिसतोय। आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच भेसळखोर आणि काळाबाजार करणाऱ्यांची झोप उडाली आहे।

गेल्या आठवड्याभरात राज्यभरात धडाधड छापेमारी सुरू आहे। संशयित अन्नसाठे जप्त, नियम मोडणाऱ्या कंपन्या सील, बेकायदा गोदामांवर कारवाई – असा सपाटा लावल्याने वर्षानुवर्षे मोकाट सुटलेल्या भेसळ माफियांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे।

‘सिस्टम अचानक जागा कसा झाला?’
प्रशासनिक वर्तुळात चर्चा आहे की मुंडेंच्या येण्याने विभागाच्या कामाला गती आणि धार आली आहे। ज्या गोष्टी वर्षानुवर्षे ‘चालू द्या’ म्हणून दुर्लक्षित होत्या, त्या आता रडारवर आल्या आहेत।

पण मेलघाटचं काय? 
राज्यात कारवाईचा सपाटा सुरू असताना आदिवासी बहुल मेलघाटातील नागरिकांचा सवाल आहे – ‘इथे कधी येणार FDA?’ मेलघाटसारख्या दुर्गम भागात आजही निकृष्ट दर्जाचा किराणा, भेसळयुक्त तेल, बनावट औषधे, भेसळयुक्त दूध, मिष्ठान्न सर्रास विकली जात असल्याच्या तक्रारी आहेत। आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या या भागात भेसळीचा थेट परिणाम आदिवासींच्या जीवावर होतो। त्यामुळे मुंडेंची धडक मोहीम मेलघाटात पोहोचणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। स्थानिकांनी मागणी केली आहे की शहरांप्रमाणेच आदिवासी भागातही तातडीने छापे टाकून कारवाई करावी।

पण याच वेळी सामान्य माणसाचा सवाल आहे – ‘आठवड्याभरात इतका माल सापडतोय, मग इतकी वर्षे हा भेसळीचा बाजार चालूच कसा होता?’ निकृष्ट अन्नामुळे थेट लोकांच्या जीवाशी खेळ सुरू होता, मग कारवाईला मुहूर्त कशाला लागला? नागरिक या कारवाईचे स्वागत करत आहेत, पण ‘उशीर का झाला’ हा प्रश्नही विचारत आहेत।

इच्छाशक्तीचा दाखला, पण पुढे काय?
एक अधिकारी ठरवून कामाला लागला तर बदल घडतो, हे मुंडेंनी दाखवून दिलं। पारदर्शकता आणि जबाबदारीने काम केलं तर ‘काही होत नाही’ ही मानसिकता बदलते, याचं हे उदाहरण।

मात्र खरी कसोटी पुढे आहे। ही मोहीम फक्त ‘सुरुवातीचा धडाका’ ठरेल की सातत्याने चालेल? राज्यात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि राजकारण हे समीकरण नवीन नाही। त्यामुळे भेसळीविरुद्धचं हे युद्ध किती दिवस चालतं आणि त्याचा कायमचा इम्पॅक्ट पडतो का, याकडे महाराष्ट्रा सोबत मेळघाट चा लक्ष लागलंय।

युवा मेलघाट निर्भीड वार्तापत्र 
जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांवर बेधडक 

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

Leave a Comment