मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

आमदार केवलराम काळे ‘ॲक्शन मोड’मध्ये – डिझेलपासून पाण्यापर्यंत प्रश्नांचा घेतला आढावा!

---Advertisement---

विविध प्रश्नांवर प्रशासकीय बैठक व जनसंवाद

युवा मेलघाट न्यूज | प्रतिनिधी
धारणी / दि.5 जून : “जनतेचे प्रश्न सोडवायचे म्हणजे ऑफिसात बसून चालत नाही, फिल्डवर उतरावं लागतं!” हाच फंडा घेऊन आमदार केवलरामजी काळे आज धारणीच्या दौऱ्यावर होते।

सकाळचा पहिला टप्पा – तहसीलदार दरबारी:
पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आणि शेतकऱ्यांची होणारी अडचण, या मुद्द्यावर तहसीलदार साहेबांसोबत थेट चर्चा केली। “शेतीची कामं थांबता कामा नयेत, पुरवठा सुरळीत ठेवा,” अशा स्पष्ट सूचना यावेळी दिल्या व जनतेच्या विविध समस्या मांडल्या।

दुसरा टप्पा – नगरपरिषदेवर मोर्चा:
त्यानंतर थेट मुख्याधिकारी धारणी यांच्या केबिनमध्ये। नगरसेवकांना सोबत घेऊन पाणीटंचाईच्या झळा मांडल्या। “उन्हाळा वाढतोय, पण बायकांची घागर रिकामीच… शहरातील घाणकचरा, अस्वच्छते मुळे होणारा आरोग्य विषयक धोका, पाणीपुरवठा व धारणीकरांचे विविध प्रश्न मांडुन आता तातडीने सोडवावा लागेल,” असा आक्रमक पवित्रा घेत सविस्तर चर्चा केली।

तिसरा टप्पा – जनतेच्या दारी:
दुपारनंतर जनसंपर्क कार्यालयात ‘जनता दरबार’ भरवला। ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या रांगा लागल्या। कोणी रस्त्याची, कोणी लाईटची, कोणी दाखल्याची समस्या मांडली। आमदारांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावले आणि जागच्या जागी अनेक प्रश्न मार्गी लावले।

आमदार केवलरामजी काळे म्हणाले:
“मेलघाटच्या जनतेचा आवाज बनून काम करतोय। पाण्यापासून पेट्रोलपर्यंत आणि विकासकामांपासून वैयक्तिक अडचणींपर्यंत… प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी मी 24 तास उपलब्ध आहे। कामं गतीने झाली पाहिजेत, यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील।” फक्त आश्वासनं नाही, तर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन फिल्डवर उतरून प्रश्न सोडवण्याची केवलरामजींची स्टाईल आज पुन्हा धारणीकरांनी अनुभवली!
यावेळी भाजपा नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment