मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मेळघाटात 48 तासात 3 आश्रमशाळांमध्ये विषबाधा, 100 हून अधिक विद्यार्थी आजारी, दोन मंत्री आणि खासदाराच्या दौऱ्यादरम्यानच घटना

---Advertisement---

मेळघाटात 48 तासात 3 आश्रमशाळांमध्ये विषबाधा, 100 हून अधिक विद्यार्थी आजारी, दोन मंत्री आणि खासदाराच्या दौऱ्यादरम्यानच घटना

युवा मेलघाट न्यूज | टिम ब्युरो
धारणी, २७ जुलै २०२६
मेळघाटात 48 तासात तीन आश्रमशाळांमध्ये घडलेल्या विषबाधेच्या घटनांनी संपूर्ण आदिवासी पट्टा हादरला आहे. धारणी तालुक्यातील टिटांबा, बिजुधावडी आणि सावलीखेडा या शासकीय आश्रमशाळांमधील 100 हून अधिक विद्यार्थ्यांना दूषित अन्नामुळे पोटदुखी, मळमळ आणि ओकारीचा त्रास झाला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या दोन दिवसात राज्यातील दोन मंत्री आणि एक खासदार मेळघाट दौऱ्यावर असतानाच या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये हा केवळ अपघात आहे की साजिश याबत शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या धारणी येथे आल्या होत्या. त्यांनी कुपोषण, माता-बाल आरोग्य आणि अंगणवाड्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीत त्यांनी पोषण आहाराचा दर्जा आणि वेळेवर तपासणीवर भर दिला होता. मात्र त्याच रात्री टिटांबा शासकीय आदिवासी आश्रमशाळेत टेंभली येथील सेंट्रल किचनमधून आले शिळे आणि दूषित अन्न खाल्ल्याने 80 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. जेवणानंतर अर्ध्या तासातच उलट्या, जुलाब आणि पोटदुखी सुरू झाली. सर्व विद्यार्थ्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शनिवारच्या घटनेतून कोणताही धडा न घेता रविवारी पुन्हा दोन ठिकाणी विषबाधा झाली. रविवारी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे धारणी आणि टिटांबा परिसराच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यादरम्यानच बिजुधावडी आश्रमशाळेत रात्रीच्या जेवणानंतर अनेक विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि मळमळीचा त्रास झाला. त्याच रात्री सावलीखेडा आश्रमशाळेतील 20 विद्यार्थ्यांना देखील विषबाधा झाली. त्यांना तातडीने साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहा. जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी सावलीखेडा आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पालकांना घाबरू नका असे आश्वासन दिले. धारणी येथून रुग्णवाहिका आणि औषधसाठा तातडीने पाठवण्यात आला. रविवारीच खासदार बळवंत वानखेडे आणि माजी आमदार राजकुमार पटेल यांनी देखील टिटांबा आश्रमशाळेला भेट दिली. त्यांनी आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या सेंट्रल किचन चालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दोन मंत्री आणि एका खासदाराच्या उपस्थितीत देखील मेळघाटातील आश्रमशाळांची सुरक्षा धोक्यात आहे, हे या घटनेने अधोरेखित केले आहे.

प्राथमिक तपासात टिटांबा, बिजुधावडी आणि सावलीखेडा या तिन्ही आश्रमशाळांना टेंभली येथील सेंट्रल किचनमधून जेवणाचा पुरवठा केला जात असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही या किचनच्या अन्नाच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आज पुन्हा विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. काही नागरिकांनी हा केवळ भोंगळ कारभार नसून यामागे काहीतरी साजिश असू शकते असा संशय देखील व्यक्त केली जात आहे.

पालक वर्ग सर्वाधिक चिंतेत आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठवणे सुरक्षित आहे का असा प्रश्न आता त्यांना पडला आहे. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषी अन्न पुरवठादार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून सेंट्रल किचन प्रणाली तातडीने बंद करावी आणि प्रत्येक शाळेत स्वतंत्र स्वयंपाकाची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे. आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बाधित विद्यार्थ्यांचे रक्ताचे नमुने आणि शिल्लक अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रशासनाकडून या सामूहिक विषबाधेच्या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. 48 तासात दोन मंत्री, एक खासदार, तीन शाळा आणि 100 हून अधिक विद्यार्थी आजारी. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित निवारा आणि पौष्टिक आहार देण्याच्या शासनाच्या दाव्यांना या घटने मोठे खिंडार पाडले आहे. आता प्रशासन यावर काय ठोस आणि वेळेवर निर्णय घेते याकडे संपूर्ण मेळघाटाचे लक्ष लागले आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

धारणी में विश्व आदिवासी दिवस पर निकली विशाल रैली: रंगभवन मैदान -बस स्टैंड- जयस्तंभ चौक से होते हुए शहर में गूंजे “आदिवासी एकता के नारे

मेळघाटच्या भोकरबर्डीतून उंच भरारी! शिक्षक प्रा. संजयकुमार राठोड यांना पीएच.डी. पदवी, गावकऱ्यांकडून दिमाखात सत्कार

अमरावतीत १५ ऑगस्टला भव्य महारक्तदान शिबीर: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे नागरिकांना आव्हान!

धारणी में 9 अगस्त को धूमधाम से मनाया जाएगा गुरु पूजन उत्सव: “भगवा ध्वज हमारा गुरु, राष्ट्रसेवा हमारा संकल्प” – संघ मुख्य वक्ता होंगे अमरावती विभाग प्रचारक केदार जी जोशी

धारणी नगर पंचायतीच्या 4 कोटींच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप: चौकशीची मागणी

धारणी येथे मतदार जनजागृती रॅली; प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे – तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचे आवाहन

Leave a Comment