धारणीतील सकल हिंदू समाज तथा लखदातार परिवाराच्या मार्गदर्शनात धारणी येथील श्री राधाकृष्ण नगरी होली चोक येथे २४ मार्च मंगळवार रोजी संध्या ०६ वाजता… विश्वास सांवरे का फाग महोत्सव भजन संध्या चे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध भजन गायक कोलकाताचे सौरभ शर्मा, मुंबईचे राजुजी खंडेलवाल, जयपूर चे मामराज अग्रवाल व राजुजी राठोड आणि अमरावतीचे माहिर जी कलावटे यांच्या भजनाचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बाबाचे भक्त कामाला लागलेले आहेत. धारणी शहरात श्याम बाबांच्या भक्तांतर्फे भजन संध्या, पुष्प वर्षा, इत्रवर्षा, छप्पन भोग तथा खास महिलांसाठी चमत्कारी मेहेंदीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष असे की, धारणी तालुक्यातील खारी गावं फाटावर खाटू श्याम मंदिराचे नवनिर्माण काम प्रगतीवर आहे. श्याम जगतातील प्रसिद्ध गायकांची भजन संध्या धारणी शहरात आयोजित करण्यात आलेली आहे. अमरावती लोकसभा ची माजी खासदार नवनीत राणा व मेळघाट चे लोकप्रिय आमदार केवलराम जी काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्व सनातनी हिंदू भक्तांनी भजन संध्या चे लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्री खाटू श्याम भक्तानां निवेदन
खारी गावं फाटा येथील नव निर्मित खाटू श्याम मंदिर चा गुम्बज कार्य प्रगतीपथावर आहे. १८ फिट कार्य चे निर्माण झाला आहे आणि ३१ फिट प्रयंत गुम्बज निर्माण चा निर्धार आहे. सर्व खाटु श्याम प्रेमिनां मंदिर निर्माण साठी सहकार्य करण्याचे आवाहन व विनंती करण्यात आली आहे.
संपर्क सूत्र:

श्री वासुदेव मालवीय खारी ७०८३०१०७६८, श्री साहेबलाल कापसे खारी, श्री सुभाष मालवीय खारी, श्री संदीप शर्मा खारी












