मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामस्थांना दिलासा: केवळराम काळेंच्या प्रयत्नाने परतवाडा-सेमाडोह मार्गे रायपूर, हतरू, रुईपाठार आणि काजलडोह बस सेवा पुन्हा सुरू

---Advertisement---

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामस्थांना दिलासा: आमदार केवळराम काळें च्या प्रयत्नाने परतवाडा-सेमाडोह मार्गे रायपूर, हतरू, रुईपाठार आणि काजलडोह बस सेवा पुन्हा सुरू

युवा मेलघाट न्यूज | प्रतिनिधी परतवाडा
परतवाडा. मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आमदार केवळराम काळे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे परतवाडा आगारातून सेमाडोह मार्गे रायपूर, हतरू, रुईपाठार आणि काजलडोहसाठी बंद झालेली बससेवा आज पुन्हा सुरू करण्यात आली.

वास्तविक ही बससेवा 2014 मध्ये केवळराम काळे आमदार असताना सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे ही सेवा बंद करावी लागली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील ग्रामस्थांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. 2024 मध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर आमदार केवळराम काळे यांनी प्राधान्याने या मार्गाचा सर्वे केला. खराब रस्त्यांची दुरुस्ती करून घेतल्यानंतरच या बससेवांना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

या नवीन सेवेअंतर्गत आता परतवाडा – सेमाडोह मार्गे रायपूर – हतरू – रुईपाठार आणि परतवाडा – सेमाडोह मार्गे रायपूर – हतरू – काजलडोह या दोन मार्गांवर एसटी बस धावणार आहेत. यामुळे विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुभारंभ प्रसंगी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परतवाडा आगार परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. “हरित आणि स्वच्छ परिसर” निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या प्रसंगी गजानन कोल्हे, अचलपूर तालुकाध्यक्ष समीर हावरे, चिखलदरा तालुकाध्यक्ष आलोक अलोकर, दिनेश चव्हाण, भैय्याल मावस्कर, विजय मांडले, श्रीराम आठवले, अभिषेक राठोड, शैलेश म्हला, यशवंत काळे, संदीप पाचघरे, नितेश राठोर, अमोल जाधव, नितीन चावरे, अविनाश यावले यांच्यासह आगार प्रमुख वासनिक मॅडम, गोडे साहेब आणि महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment