मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

लाखों रुपये खर्च करून ही मेळघाटचे रस्ते खड्ड्यात: नागरिक संतप्त

---Advertisement---

लाखो रुपये खर्च करून ही मेळघाटचे रस्ते खड्ड्यात: नागरिक संतप्त

युवा मेलघाट न्यूज | टिम ब्युरो
धारणी, 28 जुलै 2026
मेळघाट क्षेत्रात रस्ते विकास आणि दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करूनही प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. धारणी लोक निर्माण विभागा अंतर्गत येणारा टिटा़बा-सावर्या-कासमार-खिडकी हा 6 किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यावर जागोजागी एक फूट खोल खड्डे पडले आहेत. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णवाहिका, शालेय बस आणि दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही याचा मोठा फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की बराच वेळ झाला तरी रस्त्याची खरी दुरुस्ती झालेली नाही. मात्र दुरुस्तीच्या नावावर लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

ग्रामीणांनी आरोप केला आहे की ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीने निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आणि त्याचे पैसे काढण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. केवळ हा रस्ताच नाही तर मेळघाटातील इतर महत्वाचे रस्तेही खराब स्थितीत आहेत. धारणी-बैरागड-कुटंगा, धारणी-राणीगांव, धारणी-ढाकना आणि हरिसाल-अकोट यासारखे रस्तेही खड्ड्यात गेले आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ग्रामीणांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. शेतीमालाची वाहतूक, आरोग्य आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. निधीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा दावा केला जातो, परंतु काही महिन्यांतच रस्ते पुन्हा खराब होतात. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि देखरेखीच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामीणांच्या म्हणण्या नुसार धारणी उपविभागातील संबंधित अधिकारी परतवाडा आणि अमरावती वरून येऊन पाहणी करतात. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर लक्ष दिले जात नाही.

मेळघाटातील निकृष्ट रस्ता कामाचा सोशल मीडिया वर वायरल विडियो| युवा मेलघाट न्यूज

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रस्ते बांधकामातील कथित अनियमितता, निकृष्ट दर्जाचे काम, अपूर्ण विकास कामे आणि संशयास्पद पेमेंटची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पैसे खाणाऱ्या ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात सरकारी निधीचा योग्य वापर होऊन लोकांना चांगल्या रस्त्याची सुविधा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे निकृष्ट रस्ता कामा मुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांचे दर एक दोन आठवड्यात एक्सीडेंट होऊन मृत्यू होत आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment