मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गवळी समाज बांधवांचा सोहळा उत्साहात साजरा

---Advertisement---

टाळ-मृदंगचा निनाद हरिनामाचा जयघोष! भक्ती, परंपरा, संस्कृतिचे दर्शन आकर्षक झांकी आणि पारंपरिक वेशभूषेने सजला सोहळा; समाजाच्या एकजुटीचे घडले प्रभावी दर्शन

युवा मेलघाट न्यूज |धारणी प्रतिनिधी________________ श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धारणी येथे गवळी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण धारणी शहर कृष्णमय झाले होते. भव्य शोभायात्रा, हरिपाठ मंडळी, आकर्षक झांकी, टाळ-मृदंगाचा गजर आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे जन्माष्टमी उत्सवाला विशेष रंगत आली.

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला रात्री भजनसंध्या व श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भजन, हरिनामाचा गजर आणि श्रीकृष्णाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. महिला, पुरुष, युवक तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष ____________________________ जन्माष्टमीच्या दिवशी काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. धारणीसह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने समाजबांधव शोभायात्रेत सहभागी झाले. वडगाव फतेपूर, टेंभुसोंडा, आंबापाटी, बोरी, जुनुना, आदर्श देवगाव तसेच जामली येथील हरिपाठ मंडळींनी टाळ-मृदंगाच्या गजरात सहभाग नोंदविला.

शोभायात्रेत सहभागी समाजबांधवांनी पारंपरिक कुर्ता, धोतर, टोपी अशा वेशभूषेत उपस्थित राहून पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविले. टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा जयघोष आणि श्रीकृष्णाच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. शोभायात्रेत विविध आकर्षक झांक्याही सादर करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले.

शोभायात्रेदरम्यान भक्तिमय वातावरण निर्माण करून श्रीकृष्णाच्या विचारांचा आणि भक्तीचा संदेश समाजबांधवांनी दिला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने हा सोहळा समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरला.

हरिपाठ मंडळी व कलाकारांचा गौरव __________________ शोभायात्रेनंतर आयोजित कार्यक्रमात विविध हरिपाठ मंडळी तसेच झांकी सादर करणाऱ्या कलाकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या समाजबांधवांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

यावेळी समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी विवेक देविदास हेकडे याला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल त्याचा तसेच त्याच्या आई-वडिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विवेकच्या यशाचे उपस्थितांनी कौतुक केले.

समाजाच्या एकजुटीचे दर्शन __________________________ जन्माष्टमी उत्सवाच्या निमित्ताने गवळी समाजातील विविध गावांतील समाजबांधव एकत्र आले. धार्मिक कार्यक्रमासोबतच समाजातील एकोपा, संस्कृती आणि पारंपरिक वारसा जपण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपालांचा उत्स्फूर्त सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

कार्यक्रमाच्या शेवटी ज्ञानदेव येवले यांनी गवळी समाजाच्या वतीने सर्व हरिपाठ मंडळी, झांकी सादर करणारे कलाकार, समाजबांधव, महिला, युवक तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. समाजाची एकजूट, संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

भक्ती, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकजुटीचा सुंदर संगम घडविणारा हा जन्माष्टमी उत्सव धारणीतील गवळी समाजासाठी अविस्मरणीय ठरला.

—Advertisement—
मालविया मूर्ति भंडार, रंगभवन मैदान, जयस्तंभ चौक धारणी. संजय मालवीय मो. 9420190084

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment