मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया: “युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही, दोषींना कठोर शिक्षा”

---Advertisement---

NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया: “युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही, दोषींना कठोर शिक्षा”

युवा मेलघाट न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: NEET पेपर लीक प्रकरणानंतर विरोधकांच्या आंदोलनामुळे देशभरात गदारोळ माजला होता. अखेर कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर पहिल्यांदा मौन सोडले. मंगळवारी झालेल्या NDA संसदीय पक्षाच्या “मंगल मिलन” बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “युवकांच्या भविष्याशी कोणीही खेळ करू देणार नाही. पेपर लीकच्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पेपर लीक हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा राजकारणाचा विषय नाही. हा देशाच्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. बातमी समोर येताच सरकारने तातडीने कारवाई करत 13 आरोपींना अटक केली आणि त्यांना तुरुंगात पाठवले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पुनर्परीक्षेला प्राधान्य दिले आणि ती यशस्वीरित्या पार पाडून निकालही वेळेत जाहीर केला. “पुढे असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आपल्याला एक दोषरहित आणि Foolproof परीक्षा यंत्रणा तयार करावी लागेल,” असे मोदींनी सांगितले. यासाठी देशातील सर्व राज्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पेपर लीकमध्ये सहभागी असलेल्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी सरकार सर्वोच्च दर्जाच्या वकिलांची मदत घेणार आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, CJP च्या संसद मोर्चादरम्यान मोठा गोंधळ झाला. आंदोलक संसदेजवळ पोहोचताच दिल्ली पोलीस आणि RAF कडून लाठीचार्ज करण्यात आला. अश्रुधुराचे नळकांडेही फोडण्यात आले. मोर्चानंतर CJP चे सौरव दास आणि आशुतोष राकां यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. जवळपास दोन फेऱ्यांमध्ये चर्चा झाली. नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांना त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात देण्यास सांगितल्या. त्यानुसार संध्याकाळी 4 वाजता CJP ने आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्र्यांकडे सुपूर्द केले. मात्र सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही, असे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकार विद्यार्थ्यांबाबत पूर्णपणे संवेदनशील आहे आणि भविष्यात पेपर लीक रोखण्यासाठी कडक कायदे आणि यंत्रणा उभारली जाणार आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

Leave a Comment