उन्हाळा वाढत असतानाच धारणी शहरात पाणीटंचाईचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. गेल्या 6-7 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने नगर पंचायतीच्या जलपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचारी संतापले आहेत. पगार न दिल्यास काम बंद करून आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी मुख्याधिकारी आणि नगर प्रशासनाला दिला आहे. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, पगार रखडल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीन झालंय. आधीच काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जर कर्मचारी काम बंद करतील तर संपूर्ण शहराची पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडू शकते.

प्रशासनावरही प्रश्नचिन्ह
युवा स्वाभिमान पार्टीचे तहसील अध्यक्ष दुर्योधन जावरकर यांनी नगर पंचायतीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “रामभरोसे कारभार सुरू आहे. गरिबांच्या कामांकडे दुर्लक्ष होतंय. रिक्त पदांवर तातडीने भरती करा.”
उष्णता वाढत असताना पाणी, प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.










