मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश; बनावट बियाणे-खतांबाबत कृषी विभागाकडून तातडीने कारवाईचे आदेश

---Advertisement---

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश; बनावट बियाणे-खतांबाबत कृषी विभागाकडून तातडीने कारवाईचे आदेश

युवा मेलघाट न्यूज | टिम ब्युरो
अमरावती, दि. 30 जुलै 2026
महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या बनावट व निकृष्ट दर्जाच्या बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीविरोधात संघटने केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा कृषी विभागाने तातडीने कारवाईचे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र शेतकरी संघटना अमरावती ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष पार्थ प्र. लोडम यांनी नुकतेच जिल्हाधिकारी, अमरावती यांना निवेदन सादर केले होते. त्यात शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक, उत्पादनात घट आणि बनावट कृषी निविष्ठा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

या निवेदनाची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कु. अर्चना निस्ताने यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रे आणि तालुकास्तरीय यंत्रणांना पत्र जारी केले आहे. दि. 06.07.2026 च्या पत्रानुसार सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तात्काळ पाहणी करून आवश्यक नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पत्रात नमूद केले आहे की, तालुकास्तरावर तक्रार प्राप्त झाल्याबरोबर तालुका तक्रार निवारण समितीमार्फत तात्काळ कार्यवाही करावी. या समितीचे अध्यक्ष संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी असतील. तसेच शास्त्रज्ञ उपलब्ध करून देऊन विहित कालावधीत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
सध्या पावसाळी हंगाम सुरू असल्याने सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

याबाबत माहिती देताना जिल्हाध्यक्ष पार्थ लोडम म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. भविष्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटना ठामपणे आवाज उठवत राहील. बनावट बियाणे, खते व कीटकनाशकांचा व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करूनच शेतकऱ्यांचे हित जपता येईल.”
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी हे पत्र घातखेड, चांदुर रेल्वे व दुर्गापूर, नांदगाव खंडेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रांसह विभागीय कृषी सहसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी आणि सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

दर्यापूर तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – सर्वपक्षीय मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

दर्यापूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी

महाराष्ट्रातील लाखो महिलांना ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर मान्यता!महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ विधानसभेत एकमताने मंजूर – सातबारा नसतानाही मिळणार महिला शेतकरी प्रमाणपत्र

Leave a Comment