मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा – महाराष्ट्र शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

---Advertisement---

बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा – महाराष्ट्र शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

युवा मेलघाट न्यूज़ | प्रतिनिधि अमरावती
अमरावती. महाराष्ट्र शेतकरी संघटना, अमरावती ग्रामीणच्या वतीने जिल्ह्यात बनावट व निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष पार्थ प्रफुल्लराव लोडम यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दि.17 जुलै 2026 रोजी मा.जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन सादर केले।

निवेदनात काय म्हटले?
निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची बनावट बियाणे, खते व कीटकनाशकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे। त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून उत्पादनात घट झाली आहे। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या 5 प्रमुख मागण्या:

  1. विशेष तपासणी मोहीम – जिल्ह्यात संशयित दुकानांची तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत तपासावेत।
  2. कठोर कारवाई – दोषी विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत।
  3. बनावट माल जप्ती – बाजारात आढळणारा बनावट माल तात्काळ जप्त करावा।
  4. तक्रार निवारण कक्ष – शेतकऱ्यांसाठी विशेष तक्रार निवारण कक्ष किंवा हेल्पलाईन सुरू करावी।
  5. संयुक्त धाडी – कृषी विभाग, पोलीस विभाग व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकांकडून नियमित धाडी टाकण्यात याव्यात।

पार्थ लोडम म्हणाले की, “शेतकरी हा अन्नदाता आहे। त्याच्या हिताशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालता कामा नये। प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा”। यावेळी ओम तायडे, अनिश वैद्य, आदर्श ठाकरे, प्रसन्न पाटील, शिवम धोत्रे, कृष्णा नंदने, पियुष गायकवाड, शुभम शेडके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते।

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

१८०५ सालापासूनची परंपरा जपत थिलोरीत गणेशोत्सवाचा भक्तिमय सोहळा,श्री मारोती संस्थानचा नवसाला पावणारा गणपती; तिसऱ्या पिढीकडूनही पारंपरिक विसर्जनाची सेवा

विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी २७ सप्टेंबरला धारणीत विशेष प्रमाणपत्र अभियान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : दहा दिवसांत 60 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे

सेमाडोह येथे 27 सप्टेंबरला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर, सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार

भोंडिलावा येथे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करा; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

Leave a Comment