मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ : मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मान्यता

---Advertisement---

निवडणुक आचार-संहिता मुळे घोषणा नाही

युवा मेलघाट |
मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत `पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना` ला मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे योजना?
1. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी: 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे.

2. नियमित कर्जदारांना बक्षीस: जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे.

3. 56 लाख शेतकऱ्यांना लाभ: या कर्जमाफीचा राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून एकूण 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे.

घोषणा कधी झाली?
राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च 2026 रोजी ही घोषणा केली होती. त्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. समितीने अहवाल सादर केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?
`शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. यासाठी समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत` असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करताना म्हणाले.

पुढे काय?
विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर राज्यात ही कर्जमाफी लागू केली जाणार आहे. सहकार विभाग अटी व शर्तींसंदर्भात परिपत्रक काढणार आहे.

---Advertisement---
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

और पढ़ें

खरीप हंगाम २०२६ मध्ये २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, धारणी आणि चिखलदरा तालुक्याचा समावेश, १२ उपाययोजनांना मंजुरी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय झाला निर्णय; पंचनामे व पहिली अधिसूचना कधी?

दर्यापूर तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – सर्वपक्षीय मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

दर्यापूर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी

महाराष्ट्रातील लाखो महिलांना ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर मान्यता!महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ विधानसभेत एकमताने मंजूर – सातबारा नसतानाही मिळणार महिला शेतकरी प्रमाणपत्र

सर्व गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! आपल्या गणेशोत्सवाची परंपरा जगभर पोहोचवा, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीचे आवाहन – http://Bappa.org ला भेट द्या

Leave a Comment