मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

भोकरबर्डीच्या आश्रम शाळेचा निकाल 100% – मेलघाटचा गौरव

---Advertisement---

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्था गुरुकुंज आश्रम संचालित, भोकरबर्डी येथील आदिवासी आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या दहावी-बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवून मेलघाटचा नावलौकिक वाढवला आहे।

बारावी कला व विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून दहावीचा निकाल 95.58 टक्के लागला आहे। आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे हे यश विशेष उल्लेखनीय ठरले आहे।

बारावी विज्ञान शाखेत विराज सुरजकुमार वाघमारे यांनी 86.73% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला। कृष्णल सुरेश आठवले 77.82% तर प्रीती गोवर्धन बारगजे 77.73% गुणांसह उत्तीर्ण झाल्या।

बारावी कला शाखेत रेशमा रामसिंग बेठेकर 63.73%, प्रतिभा झनकलाल भिलावेकर 61.73% व नयना दादू जावरकर 61.17% गुण मिळवून यशस्वी झाल्या।

दहावीत स्वाती दीपक भिलावेकर हिने 76.66% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला। दीपिका चंदनसिंग गौली 76.20%, तर कर्तव्य अमरसिंग जावरकर व कोमल रवींद्र भिलावेकर यांनी प्रत्येकी 73.20% गुण मिळवले।

या यशामागे मुख्याध्यापक ओमप्रकाश पारडे, संजय जारी, उमेश गहूकर, गजानन धुप्पे, संजय राठोड, अजय गुंड, प्रशांत हरणे, गजानन बारड, विजय शिंदे, भूषण चौधरी, ममता तांडील आणि अमित निचीत या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आहे।

संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब आवारे, सचिव डॉ. राजाराम बोथे तसेच शाळा समिती अध्यक्ष दिगंबरराव निश्चित यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या।

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment